चॅटजीपीटी काय आहे ? | What is ChatGPT ?


चॅटजीपीटी हे AI Technology व्दारे सादर केलेले नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग टूल आहे. यावर आधारित चॅटबॉट्स आपल्याला मानवी प्रतिक्रियांसारखी उत्तरे देवू शकतात. हे टूल आपल्या प्रश्नांची उत्तरे देवून आपल्याला वेगवेगळ्या कामांमध्ये अदा. इ मेल लिहीणे, निबंध लिहीणे, वेगवेगळे कोड लिहिणे यासारखी कामे करु शकतात.
सध्या हे तंत्रज्ञान सर्वासाठी मोफत उपलब्ध करुन दिलेले आहे. सध्या या टूलवर संशोधन सुरु असल्याने लोकांच्या प्रतिक्रिया अभ्यासासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. याची पेड आवृत्ती कंपनीने ChatGPT Plus नावाने बाजारात उतरवली आहे.

चॅटजीपीटी काय आहे ?


चॅट जीपीटी कुणी तयार केले ?


ओपन ए आय सा संशोधन कंपनीने याची निर्मिती केली आहे. सर्वप्रथम 30 नोव्हेंबर 2022 ला कंपनीने याची औपचारीक घोषणा केली. याच ओपन एआय ने DALL-E2 हे एआय आधारीत आर्ट जनरेटर व व्हिस्पर ही स्पिच रिकक्गिशन प्रणाली विकसित केली आहे.

चॅट जीपीटी कुणी तयार केले


चॅटजीपीटी ची एवढी चर्चा का आहे ?


खरे तर ओपनएआय चे संस्थापक प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क हे आहेत. ज्यांनी नंतर ती कंपनी सोडली. त्यांच्यानुसार ओपनएआय एक प्रचंड शक्तीशाली आहे. मानवी सभ्यतेला चिंता वाटावी अशी त्याची ताकद आहे. याच्या लोकप्रियतेचे एक उदाहरण येथे पुरेसे आहे. लाँच झाल्यानंतर अवघ्याा पहिल्या 5 दिवसांतच 10 लाख लोकांनी याचा वापर केला होता.हे तंत्रज्ञान हे आतापर्यंतच्या काळातील सर्वात वेगाने लोकप्रिय होणारे तंत्रज्ञान ठरले आहे. लाँच झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात याचे वापरकर्ते 10 कोटी पर्यंत पोचले होते. तुलनाच करायची असेल तर टिकटॉक या ॲप ला हा आकडा पार करण्यासाठी 9 महिने लागले होते.


चॅटजीपीटी चा अनुभव कुठे घेता येईल ?

चॅटजीपीटी चा अनुभव कुठे घेता येईल


चॅटजीपीटी वापरासाठी तुम्हाला chat.openai.com या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. येथे गेल्यावर तुम्हाला तेथे अकाउंट बनवावे लागेल. एकदा का तुमचे खाते तयार झाले की तुम्हाला चॅटजीपीटी वापरणे सुरु करता येईल. संभाषण सुरु करण्यासाठी तुम्ही प्रश्न विचारु शकता. अर्थात अजून तरी मराठी भाषेला चॅटजीपीटी सपोर्ट करत नाही. पण इंग्रजीतून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला चॅटजीपीटी कडून मिळतील. चॅटजीपीटी अजून रिसर्च फेज मध्ये असल्याने तुम्ही कितीही प्रश्न विचारु शकता.
18 मे पासून तुम्ही चॅटजीपीटी मोबाईल फोनमधील ॲप मध्ये सुद्धा वापरु शकता.


चॅटजीपीटी वापरण्यासाठी किती खर्च येईल ?


चॅटजीपीटी पूर्णपणे मोफत उपलब्ध करुन दिलेली आहे. मग याचा वापर तुम्ही तुमच्या मनानुसार निबंध लिहीण्यासाठी करा, माहिती विचारा किंवा कोड तयार करा. सर्व गोष्टी मोफत आहेत. चॅटजीपीटी मध्ये तुम्हाला सबस्क्रिप्शन सुद्धा घेता येते. दरमहा 20 डॉलर्स म्हणजे साधारणत:1650 रुपये एवढी याची किंमत आहे. पेड सबस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी ॲडव्हॉन्सड् मिळतात. उत्तरांचा वेग जास्त आहे, प्लगिन्स उपलब्ध करुन दिलेले आहेत ज्याव्दारे चॅटजीपीटी चा पूर्ण क्षमतेने वापर करणे शक्य होते. काही गोष्टी सोडल्या तर मोफत सेवा ही तेवढ्याच दर्जाची आहे. पण यात तुम्हाला लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) ज्याला चॅटजीपीटी 4 म्हटले जाते, मिळणार नाही.
मला चॅटजीपीटी वारताना उत्तर मिळत नाही. I am at Capacity असा प्रतिसाद मिळाला. याचा अर्थ काय आहे?
सध्या चॅटजीपीटी वापरासाठी मोफत उपलब्ध आहे. त्याचे वापरकर्ते सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. ही सेवा सर्व्हरवरुन मिळत असते. वापरकर्ते जास्त असतील तर काही वेळा असा प्रतिसाद मिळू शकतो. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला चॅटजीपीटी वापरताच येणार नाही. थोड्या वेळाने प्रयत्न करा किंवा पेज रिफ्रेश केल्यास ही अडचण दूर होईल.
याचबरोबर तुम्ही बींग चॅट बॉट वापरू शकता. हे चॅट बॉट मोफत आहे. त्याचबरोबर चॅटजीपीटी 4 वर आधारित आहे.
लोक चॅटजीपीटी चा वापर कसा करतात ?
चॅटजीपीटी मॉडेल मध्ये प्रचंड डाटा भरलेला आहे. या लँग्वेज मध्ये सोप्या भाषेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चॅटजीपीटी देते.मग ते निबंध लिहीणे असो , कविता करणे असो, एखाद्या आर्ट वर्क चे वर्णन करणे असो एक ना अनेक अशा अनेक गोष्टी चॅटजीपीटी करु शकते. टु डू लिस्ट असो वा किराण्याची यादी या गोष्टी चॅटजीपीटी साठी अवघड नाहीत.


चॅटजीपीटी काम कसे करते ?


ओपनएआय ने बनविलेल्या लँग्वेज मॉडेल आर्किटेक्चर (Language Model Architecture)ज्याला जनरेटीव्ह प्रि ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर (Generative Pre-trained Transformer -GPT) असे नाव आहे यावर आधारीत चॅटजीपीटी कार्य करते. सध्याची या जीपीटी मॉडेल ची आवृत्ती 3.5 आहे. सबस्क्रिप्शन प्लॅन मधील जीपीटी मॉडेल मात्र यापेक्षा सुधारीत म्हणजे जीपीटी 4.0 आहे.
या प्रकारचे जीपीटी मॉडेल हे इंटरनेटवरील प्रचंड डाटा प्रोसेस करुन ट्रेन केले जातात. यानंतर या मॉडेल्स ला फाईन ट्यून करण्यासाठी सुपरवाईज्ड लर्निंग केले जाते. मानवी सूचनांना (RLHF)समजून हे मॉडेल्स स्वत:मध्ये बदल करत असतात. हे या तंत्रज्ञानाचे वैशिष्ठ्य आहे.

चॅटजीपीटी काम कसे करते ?


चॅटजीपीटी व सर्च इंजिन मध्ये काय फरक आहे ?


चॅटजीपीटी हे युझर शी संभाषण करु शकण्यासाठी ट्रेन केलेले लँग्वेज मॉडेल आहे तर सर्च इंजिन हे इंटरनेटवरील सर्व माहिती वेबसाईट्स यांना इंडेक्स करण्याचे काम करते. या इंडेक्सिंग मुळे आपल्याला इंटरनेटवरील शोधत असलेली माहिती मिळण्यास मोलाची मदत होते. चॅटजीपीटी हे इंटरनेटवरील माहिती शोधत नाही तर ट्रेन केलेल्या मॉडेल नुसार आपण विचारलेल्या प्रश्नांना प्रतिसाद देते. त्यामुळे याच्या माहितीत तफावत असू शकते.आणखी महत्वाची गोष्ट म्हणते चॅटजीपीटी वरील माहिती ही 2021 पर्यंत उपलब्ध आहे. सर्च इंजिन च्या बाबतीत मात्र असे काही नसते. अगदी कालपरवा पर्यतची माहिती ही आपल्याला उपलब्ध होवू शकते.


चॅटजीपीटीच्या मर्यादा काय आहेत ?


चॅटजीपीटी जवळ कितीही डेटा असला तरी काही मर्यादा ही आहेत. काही प्रश्नांची उत्तरे देवू शकत नाही अशा वेळी समजेल अशा भाषेत चॅटजीपीटी ला परत प्रश्न विचारावे लागतात. आणखी एक मर्यादा म्हणजे चॅटजीपीटी एका ठराविक साच्यातच उत्तरे देते. त्यामुळे उत्तरात कृत्रिमता जाणवते.

Leave a Comment