ॲपल मॅकबुक एअर 15 2023


नुकत्याच झालेल्या ॲपलच्या वर्ल्डवाईड डेव्हलपर कॉन्फरन्स मध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती ॲपलचे सॉफ्टवेअर आणि ॲपलच्या व्हीजन प्रो या ऑगमेंटेड रिॲलिटी हेडसेट ची. पण तुम्हाला माहित आहे का ॲपल ने याच इव्हेंट मध्ये ॲपल मॅकबुक एअर 15 नवीन अपडेटेड फिचर्ससहीत लॉन्च केला आहे.
आता ॲपलने मॅकबुक एअर ( M2 2022) लाँच केलेलाच होता मग या नवीन व्हर्जन मध्ये काय विशेष आहे. चला तर जाणून घेवूयात.

ॲपल मॅकबुक एअर 15


ॲपल मॅकबुक एअर 15 (M2 2023)


प्रिमिअम डिझाईन

ॲपल मॅकबुक एअर 15


ॲपल च्या सर्व प्रॉडक्स प्रमाणे ॲपलने याच्या डिझाईन वर काम केले आहे. अत्यंत सुंदर अशा लुक मध्ये मॅकबुक एअर 15 आपल्याला पहायला मिळतो.
डायमेंशन 237.6X340.4X11.5 mm असून वजन 1.53 किग्र एवढे कमी आहे. याला दोन USB C Type पोर्ट ॲपलने दिलेले असून थंडरबोल्ट 3 मॅगसेफ 3, व 3.5 मीमी हेडफोन जॅक आपल्याला पहायला मिळतो. रंगांची गोष्ट केली तर स्टारलाईट , मिडनाईट, सिल्वर, व स्पेस ग्रे फिनिश आपल्याला मिळते.
तसे पहायला गेले तर मॅकबुक एअर 15 चे डिझाईन मॅकबुक एअर 2022 सारखेच आहे. साईज चा विचार केला ती 2022 मॅकबुक 13.6 इंचाच्या स्क्रिनसाईज मध्ये येते तर 2023 मध्ये 15.3 इंची स्क्रिनसाईज आपल्याला पहायला मिळते. मॅकबुक एअर 2022 राऊंडेड डिझाईन मध्ये येते तर 2023 मॉडेल फ्लॅट लिड मध्ये येते. याचा बेस फ्लॅट असून स्टर्डी आहे. फ्लॅट एजेस मुळे याची स्लिम फॅक्टर उठावदार वाटतो. मॅकबुक एअर 2023 ची बॉडी ॲल्युमिनिअम ची बनलेली आहे. जी या प्रॉडक्ट ला रीच लुक सोबत मजबुती सुद्धा देते.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 15 इंची मॉडेल असूनही याचे वजन फक्त 1.53 किग्र ठेवण्यात कंपनीला यश आले आहे.


किबोर्ड

ॲपल मॅकबुक एअर 15


ॲपल मॅकबुक एअर ओपन करताच आपल्यापुढे दिसतो तो मॅजिक कीबोर्ड , अर्थात मॅकबुक एअर 13 पेक्षा हा कीबोर्ड थोडा मोठा आहे. कीज च्या बाजूला थोडी जास्त जागा ॲपलने दिली आहे. आपल्या अगोदरच्या मॉडेल प्रमाणे यात आपल्याला स्पीकर्स पहायला मिळणार नाहीत. स्पिकर्सची जागा ॲपलने यात बदललेली आहे. बेसच्या मागील बाजूला स्पिकर्सची जाबा दिलेली आहे. यात दोन एक्स्ट्रा स्पिकर्स आपल्याला पहायला मिळतात.
किबोर्ड च्या खालील बाजूस ट्रॅकपॅड आहे.ट्रॅकपॅड चा रिस्पॉन्स ही उत्तम आहे. वरील उजव्या कोपऱ्यात आपल्याला फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेला आढळतो. जो पासवर्ड एन्टर करताना चांगला व सुरक्षित पर्याय ठरतो. या मॉडेल मध्ये ॲपलने फेस आडी हे फिचर दिलेले नाही.


डिस्प्ले

ॲपल मॅकबुक एअर 15


डिस्प्लेची गुणवत्ता उत्तम आहे. यात आपल्याला 15.3 इंचाचा लिक्विड रेटीना डिस्प्ले पहायला मिळतो.डिस्प्ले रेझोल्यूशन 2880 X 1864 असून 224 पिक्सेल पर इंच डेन्सिटी पहायला मिळता. डिस्प्ले चा ब्राईटनेस 500 निट्स आहे. यात ट्रू टोन सपोर्ट करतो. मॅकबुक एअर 15 मध्ये जरी फेस आय डी दिलेला नसला तरी यात डिस्प्ले च्या वर आपल्याला कॅमेरा पहायला मिळतो. डिस्पे ची जाडी 5 एम एम आहे. डिस्प्ले मोठा असल्याने काम करताना जास्त स्पेस मिळते.


पोर्टस्

ॲपल मॅकबुक एअर 15


ॲपल मॅकबुक एअर मध्ये आपल्याला मॅगसेफ चार्जिंग पोर्ट पहायला मिळते. याचबरोबर दोन थंडरबोल्ट 3 पोर्ट डाव्या बाजूला पहायला मिळतात. उजव्या बाजूला 3.5 मिमि ऑडीओ जॅक पहायला मिळतो. यात आपल्याला HDMI पोर्ट मात्र पहायला मिळत नाही. प्रोसेसर
ॲपल मॅकबुक एअर M2 processor ( 8 Core ) सोबत येतो. यात 10 जीपीयु कोर असून 16 कोर न्यूरल इंजिन आहेत. मिडीया इंजिन H.264, HVEC. ProRES, ProRES RAW सपोर्ट करते.
मॅकबुक एअर 256 जी बी / 512 जीबी स्टोरेज मध्ये मिळतो. रॅम 8 जीबी असून 24 जीबी पर्यंत अपग्रेड करता येते.


बॅटरी


ॲपल मॅकबुक एअर ची बॅटरीकॅपॅसिटी 18 तासापर्यंत बॅकअप देवू शकते असा ॲपलचा दावा आहे. रोजच्या वापरात साधारण 12 ते 14 तास बॅकअप पण पुरेसा ठरतो. चार्जिंग साठी 35 वॅट ड्युअल चार्जर प्रोव्हाईड केले जाते.
मॅक ओ एस सॉफ्टवेअर
सॉफ्टवेअर चे बोलायचे झाले तर ॲपल मॅकबुक एअर मॅक ओएस 13 Ventura वर रन करते. नेव्हीगेशन अत्यंत स्मूथ आहे. सर्च टूल जसे स्पॉटलाईट मुळे सर्च करणे अत्यंत सोपे झाले आहे. याचे हार्डवेअर येणाली Mac OS 14 ला ही सपोर्ट करते.

ॲपल मॅकबुक एअर एक सुपर्ब लॅपटॉप आहे जो आपल्याला रोजची कामे करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. प्रिमिअम बिल्ड क्वालिटी, मोठा डिस्पे , सॉलिड प्रिमिअम बिल्ड क्वालिटी अशा प्रॉमिसिंग बॅटरी लाईफ या गोष्टी ॲपल मॅकबुक एअर ला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवतात.

ॲपल मॅकबुक एअर 15

Apple 2023 MacBook Pro Laptop M2 Pro chip

SUPERCHARGED BY M2 PRO OR M2 MAX — Take on demanding projects with the M2 Pro or M2 Max chip. M2 Pro has up to 12 CPU cores, up to 19 GPU cores and up to 32GB unified memory. M2 Max has 12 CPU cores, up to 38 GPU cores and up to 96GB unified memory.

Leave a Comment