घरबसल्या आधार अपडेट कसे करावे

Aadhar Card Update kase karave 2023

तुम्हीही तुमचे आधार कार्ड  कुठल्याही आधार सेवा केंद्रात न जाता घरबसल्या अपडेट करु शकता. ते ही तुमच्या मोबाईलवरुन. आधार कार्ड च्या ऑफिशिअल वेबसाईट UIDAI वर जावून नाममात्र 50 रुपयांची फी भरुन तुम्ही नाव , जन्मदिनांक, पत्ता, मोबाईल क्रमांक इत्यादी अपडेट करु शकता.

मित्रांनो भारतातील सर्व नागरिकांना आपले आधार कार्ड बनविणे आवश्यक झाले आहे. कारण आधार कार्ड म्हणजे आपल्या ओळखीचा पुरावा असते. दुसरे म्हणजे सर्व सरकारी योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक झाले आहे. बऱ्याच गोष्टी आधार शी लिंक झालेल्या आहेत. याच कारणामुळे आधार वरील माहिती अचूक असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. आधार वरील नाव, लिंग, जन्म दिनांक , पत्ता इत्यादी तपशील अचूक असणे त्यामुळेच आवश्यक झाले आहे. ड्रायव्हिंग लायसन, बँक खाते, आय टी आर रिटर्न , पासपोर्ट , किसान कार्ड, पेन्शन कार्ड , ऑनलाईन तिकिट बुकींग अशा अनेक गोष्टींमध्ये आधार अत्यावश्यक असल्याने आधार वरील माहिती अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक ठरले आहे.

UIDAI च्या नियमाांनुसार प्रत्येक व्यक्ती आपले आधार डिटेल्स स्वत: अपडेट करु शकते. मोबाईल फोन किंवा लॅपटॉप / संगणकावरुन ही माहिती अपडेट करता येते. आधार कार्ड च्या वेबसाईट वरुन ही माहिती आपल्याला अपडेट करता येते. यासाठी आपल्याला आधार सेवा केंद्रात किंवा कुठल्याही ऑफीसला जाण्याची आवश्यकता नाही.

आधार कार्डात नाव , जन्मदिनांक, पत्ता , मोबाईल क्रमांक, लिंग कसे अपडेट करावे ?

प्रत्येक व्यक्तीच्या आधार कार्डामध्ये दोन प्रकारची माहिती असते. एक म्हणजे व्यक्तिगत माहिती व दुसरी बायोमेट्रीक विवरण असते. यात व्यक्तिगत माहिती मध्ये नाव , जन्मदिनांक, पत्ता , मोबाईल क्रमांक, लिंग यांचा समावेश होतो. बायोमेट्रीक डिटेल्स मध्ये आपल्या हाताच्या बोटांचे ठसे व डोळ्यांच्या बाहुल्यांचे स्कॅन यांचा समावेश होतो. यातील व्यक्तिगत डिटेल्स हे कुठलाही व्यक्ती घरबसल्या आपडेट करु शकतो. यासाठी 50 रुपयांची नाममात्र फी आकारली जाते जी आपण ऑनलाईन पेमेंट व्दारे भरु शकतो.

घरबसल्या आधार कार्ड अपडेट कसे करावे  ?

आधार अपडेट कसे करावे

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम एक गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे आपला मोबाईल क्रमांक आधार शी लिंक असला पाहिजे.मोबाईल क्रमांक लिंक असेल तर आपण खाली दिलेल्या स्टेप्स नुसार आधार अपडेट करु शकतो.

 • सर्वात आधी आपल्या फोन अथवा डिव्हाईस मध्ये गुगल ओपन करा.
 • गुगल मध्ये UIDAI gov in  हे टाईप करुन सर्च करा.
 • सर्वात पहिली जी लिंक आपल्यादा दिसेल (https://uidai.gov.in) ही ऑफिशिअल वेबसाईट ओपन करा.
 • आपल्यासमोर UIDAI  चे ऑनलाईन पोर्टल ओपन होईल.

आधार अपडेट पेज ओपन करणे.

 • आधार साईट ओपन झाल्यानंतर Update Aadhar या कॅटेगरीमध्ये Update Demographics Data & Check Status या पर्यायावर क्लिक करा.
 • आता नवीन पेज वर आपल्याला Welcome to My Aadhar  हे पेज ओपन झालेले दिसेल.
 • या पेज वर आपण आपल्या आधारवरील व्यक्तिगत विवरण अपडेट करु शकतो.
 • My Aadhar Portal  ओपन झाल्यावर आपल्याला सर्वप्रथम लॉगिन वर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर आपला 12 अंकी आधार क्रमांक व त्याखाली कॅप्चा कोड टाकावा लागेल.
 • यानंतर Send OTP  वर क्लिक करा.
 • आता आपल्या रजिष्टर्ड मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल हा ओटीपी आधार साईट वर टाका.
 • लॉगिन वर क्लिक करा.
 • आपण आपल्या आधार क्रमांकावरुन आधार अपडेट साईट मध्ये लॉगिन झाले आहात.
 • Update Aadhar Online  पर्याय सिलेक्ट करणे.
 • My Aadhar  पोर्टल वर लॉगिन झाल्यांनतर आपल्या समोर Services  चे पेज ओपन होईल.
 • या पेज वर Update Aadhar Online  या पर्यायावर क्लिक करा.
 • पुढील पानावर Proceed to Update Aadhar वर क्लिक करा.
 • आता आपल्यासमोर जे पेज आहे त्यात आपण आधार वरील माहिती अपडेट करु शकतो.
 • नवीन डिटेल्स अपडेट करणे
 • या पानावर तुम्ही आपले आधार कार्ड अपडेट करु शकता.
 • या पानावरील नाव , जन्म दिनांक , पत्ता, लिंग , भाषा यातील जो पर्याय आपल्याला निवडायचा आहे ते चेक बॉक्स सिलेक्ट करा.
 • यानंतर प्रोसिड टू आधार अपडेट वर क्लिक करा.
 • आता अपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल, यात Current Details  या  भागात आपले सध्याचे डिटेल्स दिसतील. याच पानावर Details to be Updated भागात आपण आपल्याला जे बदल करायचे आहेत ते बिनचूक पणे करा.
 • यानंतर चा टप्पा आहे योग्य तो पुरावा अपडेट करण्याचा. या भागात आपण भरलेली माहिती प्रमाणित करा.
 • पुरावा जोडताना आपल्याला जी माहिती अपडेट करायची आहे त्यासंबंधी स्पष्ट उल्लेख पुराव्यात असेल व माहिती बिनचूक असेल याची खात्री करा.
 • यासाठी मॅन्युअल अपलोड किंवा डिजी लॉकर असेल तर त्यावरुन आपल्याला हे पुराव्याचे डॉक्यूमेंट अपलोड करायचा पर्याय आपणाकडे आहे.
 • Select Valid supporting Document  सिलेक्ट करुन योग्य तो पुरावा अपलोड करा.
 • पुरावा लोड झाल्यानंतर नेक्स्ट बटन दाबा.
 • आता आपणापुढे Dear Resident … पेज ओपन होईल. या भागात आपणाला आधार अपडेट साठी चे शुल्क 50 रुपये ऑनलाईन पे करता येईल.
 • I hereby confirm that.. यापुढील चेकबॉक्स चेक करा.
 • पुढील पानावर Choose Payment Option ओपन होईल. यापैकी आपल्याला योग्य तो पर्याय निवडून पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.
 • आता आपल्याला डाऊनलोड स्लिप मध्ये पावती डाऊनलोड करता येईल.
 • पेमेंट प्रकिया पूर्ण झाल्यानंतर आपली अपडेट रिक्वेस्ट UIDAI  कडे सबमिट झाली आहे.
 • साधारणपणे 5 ते 7 दिवसात आपले आधार कार्ड अपडेट झाल्याचा मेसेज आपल्याला मोबाईल वर येईल.

Leave a Comment