
सोमवारी पार पडलेल्या वर्ल्ड वाईड डेव्हलपर्स फोरम मध्ये ॲपलने आपला व्हिजन प्रो ऑगमेंटेड रिॲलिटी हेडसेट लाँच केला आणि इंटरनेट वर सगळीकडे त्याचीच चर्चा होवू लागली. पण याच फोरम मध्ये ॲपलने iOS चे मेजर अपडेट लाँच करण्याची घोषणा केली. येत्या वर्षात हे अपडेट लाँच केले जाईल. या अपडेट मध्ये बरेच नवीन फिचर्स येणार आहेत. उदा. पर्सनलाईझ्ड कॉल पोस्टर, स्टँडबाय मोड , लाईव्ह व्हॉईस नोट, नवीन स्टिकर्स इत्यादी.
यापैकी काही फिचर्स आपण येथे पाहणार आहोत.
1. ॲपल आपल्या कॉम्प्यूटर व्हिजन तंत्रज्ञानात अपडेट आणणार असून रेसिपी सर्च हे आप्शन युझर्स ना दिले जाणार आहे. यात आपण फूड आयटम वर क्लिक करुन त्यासारखे इतर खाद्यपदार्थ सर्च करु शकतो.
2. ॲपलचे इमेज कटआऊट फिचर ही अपडेट होणार असून यात फोटोमधील किंवा व्हिडीओमधील ठराविक भाग कट करून त्याबद्दल अधिक माहिती सर्च करता येईल.
3. फोटो ॲप आता आपले पेट्स ओळखू शकेल. व त्यांना ते पीपल्स सेक्शनमध्ये ॲड करेल.
4. फ्रिफॉर्म अपडेट मध्ये नवीन टूल्स जसे वॉटर कलर ब्रश, कॅलिग्राफी पेन, हायलायटर, कमी अधिक जाडीचे पेन व रूलर मिळणार आहेत.

5. iOS 17 मध्ये न्यूडीटी फिल्टर असणार आहे. ज्या फोटोंमध्ये प्रायवेट बॉडी पार्टचा भाग असेल असे फोटो या फिल्टर व्दारे ब्लॉक करता येणार आहेत. युझर्स ने असे फोटो ओपन केल्यावर पॉप अप ओपन होईल ज्यात युझर ची परवानगी घेतली जाणार आहे. हे फिचर सर्व फोटोंसाठी असेल. उदा. थर्ड पार्टी ॲप कडून आलेले फोटो, चॅट ॲप मधून आलेले फोटो इ.
6. याचबरोबर इमेजमधील सेन्सिटीव्ह भाग झाकण्यासाठी Blur ऑप्शन युझरकडे असणार आहे.
7. मेल मधील ओटीपी किंवा वन टाईम पासवर्ड आपोआल भरण्यासाठी ऑटो फिलींग ऑप्शन iOS 17 दिलेले असणार आहे. सेटींग मध्ये असलेल्यापासवर्ड सेक्शन मध्ये असे व्हेरीफिकेशन कोड असलेले इमेल व एसएमएस एकदा कोड वापरुन झाल्यावर आपोआप डिलीट होण्यासाठी ॲाटोमॅटीक डिलिट चे ऑप्शन युझरला असेल.
8. कॉन्टॅक्ट फिल्ड मध्ये नवीन प्रोनाऊन फिल्ड जोडले आहे.
9. iOS 17 मध्ये नवीन वॉलपेपर्स ॲड केले जातील. यान कॅलिडोस्कोप ही नवीन कॅटॅगरी ॲपलने ॲड केली आहे.
10. ॲपल म्यूझिक मध्ये शेअर्ड प्ले लिस्ट हे नवीन फिचर ॲड झाले आहे. ज्यामुळे प्लेलिस्ट मित्रांसोबर शेअर करणे , इडीट करणे सोपे झाले आहे. नाऊ प्लेईंग भागातल्या गाण्यांबद्दल त्यांना प्रतिक्रिया पण देता येईल.
11. ॲपलने म्यूझिक प्लेअर मध्ये क्रॉसफेड हा आप्शन दिले आहे. याचबरोबर नाऊ प्लेईंग बार चे डिझाईन ही बदललेले दिसेल.
12. ॲपल न्यूज + सबस्क्रायबर्स ना आता क्रॉसवर्ड व मिनि क्रॉसवर्ड की कोडी सोडविण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.
13. न्यूज+ सबस्क्रायबर्स ला आता अम्पलच्या पॉडकास्ट मधील ऑडीओ स्टोरीज ही ऐकायला मिळतील.
14. iOS 17 मध्ये Halo, Smirk Peekaboo ही नवीन 3 इमोजी स्टिकर्स पहायला मिळतील.
15. रिमाईंडर ॲम मध्ये ग्रोसरी लिस्ट चा ऑप्शन मिळतो ज्यात यादी आपोआप विभागवार लावली जाते.ही यादी आपल्याला कॉलम मध्ये ही पहायचा ऑप्शन दिलेला आहे.
16. iOS 17 मध्ये युझर 5 जणांना एअर टॅग शेअर करु शकतो.
17. आयपॅड मधील पीडीएफ ऑटोफिल हे फिचर iOS 17 मध्ये ही पहायला मिळेल. नोट्स ॲप मध्ये पीडीएफ पाहता येतील व मार्कअप करता येतील. मल्टीपल टायमर्स चा ऑप्शन ही iOS 17 मध्ये पहायला मिळेल.
18. iPadOS 17 प्रमाणेच iOS 17 मध्ये ही इंटरॲक्टीव्ह विजेट्चा ऑप्शन असणार आहेत. ज्यात ॲप न उघडताही आपल्याला बरील कामे करता येणार आहेत.
19. iOS 17 च्या वर्क ॲप मध्ये मित्रांची वर्कआऊट समरी दिसणार आहे.
20. ॲपल फिटनेस+ मध्ये युझरला कस्टम मेडीटेशन किंवा वर्कआऊट प्लॅन तयार करता येणार आहे.
21. ॲपल मध्ये साईन इन होण्यासाठी साईन इन युजिंग निअरबाय डिव्हायसेस चा ऑप्शन असणार आहे.
22. स्पॉट लाईट सर्च मध्ये सिस्टीम सेटींग जसे वाय फाय सुरु बंद करणे इ. सर्च स्क्रीनवरच करता येणार आहे.
23. जर तुमचा फोन कमी प्रकाशात असेल तर एअर पॉड्स पॉप अप्स डार्क मोड मध्ये बघायला मिळतील.
24. वेदर ॲप मध्ये कालच्या दिवसाची माहिती ही बघायला मिळेल.
अर्थात ही यादी काही संपूर्ण नाही. येत्या काळात ॲपल पब्लिक बिटा रीलीज करेल . बरेच बदल होतील त्यानुसार ही यादी कमी अधिक होवू शकते.