ॲपल व्हिजन प्रो | Apple Vision Pro

ॲपल व्हिजन प्रो

नुकत्याच पार पडलेल्या WWDC23 या इव्हेंटमध्ये ॲपलने आपला पहिला स्पॅटीयल कॉम्प्यूटर ॲपल व्हिजन प्रो ( Apple Vision Pro) बाजारात उरतवला आहे. याआधी नुकताच मेटा ने आपले डिव्हाईस आणले होते. ॲपलने यात उडी घेतल्याने ऑगमेंटेड रिॲलिटी हेडसेटचा बाजार चांगलाच गरम होणार आहे. अतिशय ॲडव्हान्स्ड तंत्रज्ञान,यासोबत उत्कृष्ट डिझाईन व संहज सेापा युजर एक्सपिरियन्स यामुळे या स्पर्धेत ॲपल बाजी मारण्याची चिन्हे दिसतात. ॲपलचा हा पहिलाच स्पॅटीयल कॉम्प्यूटर व ऑगमेंटेड रिॲलिटी डिव्हाईस आहे. या आर्टीकल मध्ये आपण ॲपलच्या या नवीन डिव्हाईस बद्दल जाणून घेणार आहोत.


डिस्प्ले


पोर्टेबल कॉम्प्यूटरमध्ये असलेल्या डिस्प्लेंमध्ये ॲपलने नवीन मापदंड स्थापन केला आहे असे म्हणायला हरकत नाही.ॲपल व्हिजन प्रो च्या डिस्प्लेचे वैशिष्ठ्य म्हणजे उत्तम दृष्य, इमर्सिव्ह अनुभव, व अत्यंत अचूक अशी रेंडरिंग. या वैशिष्ठ्यांमुळे ॲपल व्हिजन प्रो बाजारातील इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरतो. 2940X1440 रेझॉल्यूशन असलेला मोठा 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले असल्यामुळे ॲपल व्हिजन प्रो चा अनुभव अत्यंत प्रभावी ठरतो. HDR 10+ व डॉल्बी व्हिजन या तंत्रज्ञानामुळे यावरील चित्राचा कॉन्ट्रास्ट अत्यंत उत्तम असून चित्रे अतिशय जिवंत वाटतात. या तंत्रज्ञानामुळे मुळचे रंग उठावदार दिसतात.
याचे आणखी महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे ऑगमेंटेड रिॲलिटी तंत्रज्ञानासोबत अचूक समायोजन. यामुळे ऑगमेंटेड रिॲलिटी अनुभव जिवंत वाटतो. डेप्थ सेंसिंग साठी ॲपलने यात लायडर दिलेला असल्याने आपल्या आजूबाजूच्या वस्तूंचा अचूक मागोबा हे डिव्हाईस घेवू शकते. यामुळे युजरला विनाअडथळा ऑगमेंटेड रिॲलिटी चा अनुभव घेता येतो.यामुळे ऑगमेंटेड दृष्य सुद्धा खरे भासते.
उत्कृष्ट डिस्प्ले सोबतच ॲपलने यात ॲडव्हान्स्ड टच टेक्नॉलॉजी दिलेली आहे. यामुळे मेन्यू नेव्हीगेट करणे असो, गेम खेळणे असो किंवा स्टायलसव्दारे चित्रे काढणे असो याचा टच सेन्सर अचूक काम करतो. या डिव्हाईस चा टच सँपलिंग रेट जास्त असल्याने यावरील अनुभव नैसर्गिक वाटतात. ॲपलच्या इतर सर्व प्रॉडक्टप्रमाणे ॲपलने या डिव्हाईस मध्ये ही ग्राहकांचा अनुभवाला अग्रक्रम दिला आहे. यात ॲपल आय प्रोटेक्शन साठी ट्रू टोन व प्रो मोशन हे तंज्ञज्ञान वापरले आहे. ट्रू टोन मुळे आजूबाजूच्या प्रकाशानुसार कलर टेंपरेचर सेट केले जाते ती प्रो मोशन मुळे रिफ्रेश रेट उत्तम मिळतो. यामुळे वापरणाऱ्याच्या डोळ्यांना त्रा होत नाही. याचा डिस्प्ले हा OLED असल्यामुळे प्रत्येक पिक्सेल स्वतंत्रपणे कंट्रोल करता येतो. याच कारणाने बॅटरी जास्त काळ चालते.

ऑगमेंटेड रिॲलिटी

तंज्ञज्ञान दिवसेंदिवस प्रगत होत चालले आहे. या तंत्रज्ञानामुळे खऱ्या जगात कॉम्प्यूटर जनरेटेड ग्राफीक्स चा वापर करुन आभासी जग तयार करता येते. थोडक्यात काय तर आपल्या जगात आभासी जग एकत्र करुन हे तंत्रज्ञान वेगळाच असा अनुभव देते. आपण बघितले की ॲपलने व्हिजन प्रो मध्ये लायडर सेन्सर दिले आहे. त्यामुळे आभासी वस्तू अचूकपणे दर्शविता येतात. मग ते आभासी फर्निचर असो वा तुम्ही खेळत असलेला खेळातील एखादे पात्र असो. या आभासी वस्तूंशी आपल्याला अचूकपणे इंटरॲक्ट करता येते. यात तुम्ही जर खेळ खेळाल तर तो ण्क अविस्मरणिय असा अनुभव असेल कारण इतर वेळी आपण पडद्यावर बघत असतो पण यात आपण प्रत्यक्ष त्या जगात वावरल्याचा अनुभव घेत असतो. या तंत्रज्ञानामुळे कलाकार, डिझायनर्स , यांना आपल्या कल्पना मूर्त स्वरुपात आणण्यासाठी मोलाची मदत होणार आहे यात शंका नाही. या सर्वाबरोबरच ॲपलची जी इकोसिस्टम आहे त्याच्याशी हे डिव्हाईस सहज संवाद साधू शकते. याचा युझर इंटरफेस ही सहज व सोपा आहे.


कनेक्टिव्हीटी


कनेक्टिव्हीटी च्या बाबतीत ही ॲपलने व्हिजन प्रो मध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी ठेवलेली नाही. 5 जी तंत्राज्ञानाने हे डिव्हाईस इंटरनेट शी कनेक्ट होवू शकते. याचबरोबर यात वायफाय 6 ही देण्यात आले आहे ज्याव्दारे स्ट्रिमिंग ची गती वाढते. ज्यामुळे आपण यावर 4 K व्हिडीओ सुद्धा विना अडथळा स्ट्रीम करु शकतो. ब्लू टुथ 5.2 उच्च दर्जाची वायरलेस कनेक्टिव्हीटी मिळते तसेच जास्त रेंज मिळते. व्हिजन प्रो ला USB C पोर्ट ॲपलने दिले आहे. यामुळे फास्ट चार्जिंग तर मिळतेच त्याचबरोबर आपल्याला जास्त वेगाने डाटा ट्रान्सफर करता येतो.
ॲपलच्या सर्व प्रॉडक्ट याच्याशी हे डिव्हाईस सहज कनेक्ट होवू शकते.ॲपल स्टोअर वर यासाठीचे सर्व ॲप उपलब्ध होतील.


बॅटरी लाईफ


आपण जसजसे डिव्हाईसेस वर अवलंबून रहायला लागतो त्याच वेळी त्याची बॅटरी लाईफ ही महत्वाची ठरते. ॲपलची A15 बायोनिक चिप , OLED डिस्प्ले व ऑपरेटींग सिस्टम यामुळे ॲपल व्हिजन प्रो ची बॅटरी लाईफ आपल्याला चांगली मिळते. ॲडॉप्टिव्ह डिस्प्ले मुळे बॅटरीची कार्यक्षमता वाढते. योग्य बॅटरी मॅनेजमेंट मुळे बॅटरी ओव्हरचार्ज होणे , बॅटरी जास्त कार्यक्षम ठेवणे यामुळे बॅटरी लाईफ वाढायला मदत होते. क्विक चार्ज सपोर्ट मुळे आपल्याला कमी वेळेत बॅटरी चार्ज करतो येते. जेव्हा डिव्हाईस वापरात नसेल त्या वेळीही पॉवर मॅनेजमेंट मुळे जास्त वेळ बॅटरी टिकते.


मेमरी मॅनेजमेंट


ॲपल व्हिजन प्रो मध्ये Solid State Drive असल्यामुळे स्टोरेज स्पेस भरपूर मिळते तसेच रीड राईट स्पीड ही उच्च मिळतो. iCloud व्दारे सर्व माहिती आपोआप डिव्हाईस वर सिंक होते. USB C पोर्ट व्दारे आणखी स्टोरेज आपण याला जोडू शकतो. डाटा स्टोरेज साठी ॲपल ॲडव्हान्स्ड एन्क्रीप्शन वापरत असल्याने आपला डाटा सुरक्षित राहतो.


डाटा सुरक्षा


आजच्या काळात डाटासुरक्षा ही कळीचा मुद्दा बनला आहे ॲपलच्या सुरक्षित अशा इकोसिस्टम मुळे आपला डाटा सुरक्षित राहील याची काळजी ॲपलने घेतली आहे.


थोडक्यात ॲपल व्हिजन प्रो येत्या काळच्या तंत्रज्ञानाला कवेत घेणारे तंत्रज्ञान आहे. यात ॲपलने प्रचंड मेहनत घेतली असून त्यामुळे ऑगमेंटेड रिॲलिटी क्षेत्रात स्पर्धा सुरु होणार यात शंका नाही.

Leave a Comment