या ८ मार्गांनी चॅट जीपीटी ने पैसे कमवा


OpenAI ने चॅट जीपीटी लाँच केल्यापासून तंत्रज्ञानात कमालीचे बदल झाले आहेत. OpenAI Large Language Model किंवा आपण ज्याला LLM म्हणतो हे तंत्रज्ञान इतके शक्तीयााली आहे की आपण याच्या साह्याने बऱ्याच गोष्टी करु शकतो. उदा. कुणाला निबंध लिहायचा असेल, खूप सारी आकडेमोड करायची असेल, गणिताचे क्लिष्ट प्रश्न सोडवायचे असतील किंवा एखादे ॲप बनवण्यासाइी प्रोग्रामिंग कोड लिहायचा असेल अशा अनेक गोष्टी आपल्याला चॅटजीपीटी च्या साह्याने करता येतात. एवढया सगळ्या गोष्टी जर चॅट जीपीटीने करता येत असतील तर मग पैसे कमावण्याचा ही मार्ग यात नक्कीच सापडेल. आपण या लेखात असेच चॅटजीपीटी ने पैसे कमावण्याचे मार्ग पाहणार आहोत.

१.चॅटजीपीटी च्या साह्याने ॲप , वेबसाईट बनवा

चॅटजीपीटी ने पैसे कमावण्याचे  मार्ग


चॅटजीपीटी च्या साह्याने कोड न शिकताही ॲप किंवा सॉफ्टवेअर लिहून विकू शकतो. आपल्या ज्या काही कल्पना असतील त्या स्टेप बाय स्टेप आपण टाकल्या तर चॅटजीपीटी आपल्याला फायनल प्रोडक्ट साठी कोड लिहून देवू शकतो. आपल्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. नुकतेच Ihor Stefurak या युक्रेनियन नागरिकाने गुगल क्रोम साठी एक एक्सटेंशन तयार केले आणि ते विक्रीला ठेवले. Ihor ला प्रोग्रामिंग चा गंधही नव्हता. विश्वास बसणार नाही पण या क्रोम एक्सटेंशन ने त्याला २४ तासात १००० डॉलर मिळवून दिले. आहे ना कमाल ?
तुमच्याजवळ काही बिझनेस आयडीया असेल तर तुम्ही तुमच्या आयडियापासून तुमचे बिझनेस मॉडेल उभे करु शकता. त्यासाठी असलेला प्लॅन तुम्हाला चॅटजीपीटी देईल.तुम्हाला एखादी वेबसाईट बनवायची आहे किंवा एखादे HTML पेज असेल किंवा इ कॉमर्स साईट उभी करायची असेल ती चॅटजीपीटी तुमच्या मदतीला धावून येईल. योग्य इनपूट दिले तर तुम्हाला तुमच्या प्रकल्पासाठी योग्य तो कोड किंवा प्रोग्राम तुम्हाला लिहून मिळू शकतो. यासाठी तुम्हाला प्रोग्रॅमर असण्याची काहीच गरज नाही तर फक्त तर्कसंगत विचार करुन तुमच्या आयडिया तुम्हाला मांडता येणे एवढे पुरेसे आहे. बाकीवे किचकट तांत्रिक काम चॅटजीपीटी वर सोडून द्या.

२. पॅसिव्ह इनकम साठी बिझनेस आयडिया चॅटजीपीटी ला विचारा.

२. पॅसिव्ह इनकम साठी बिझनेस आयडिया चॅटजीपीटी ला विचारा.


तुम्हाला सध्याचे काम करत राहून काही पार्ट टाईम बिझनेस करायचा असेल पण काही कल्पना सुचन नसेल ती चॅटजीपीटी तुमच्यासाटी अशा कल्पना सुचविण्याचे काम करेल. उदा चॅटजीपीटी ला अशा कल्पना सुचवण्यास सांगा. तुम्ही सांगितेलेल्या निकषांप्रमाणे नक्कीच एचाादी कल्पना तुम्हाला आवडेल.
चॅटजीपीटी तुम्हाला काही जुजबी प्रश्न जसे तुमचे पूर्वज्ञान, कोणत्या क्षेत्रात काम करु शकता , किती वेळ देवू शकता अशा गोष्टी विचारेल त्यावर तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे चॅटजीपीटी तुम्हाला पर्याय सुचवेल.


३. AI चॅटबॉट तयार करा.

२. पॅसिव्ह इनकम साठी बिझनेस आयडिया चॅटजीपीटी ला विचारा.


चॅटजीपीटी च्या उदयानंतर AI आधारीत चॅटबॉटची मागणी वाढली आहे. बऱ्याच बिझनेस कंपन्या, शैक्षणिक संस्था, बरेच ॲप तसेच काही वेळा व्यक्तिगत वापरासाठी ही काही व्यक्ती हे चॅटबॉट वापरतात. असे चॅटबॉट हे त्या त्या कंपनीच्या गरजेनुसार बनविले जातात. यासाठीची प्रत्येकाची अपेक्षा ही ‍भिन्न असते. तुम्ही जर अशा चॅटबॉटस ला ट्रेन कसे करायचे आणि फ्रन्ट एन्ड कसा तयार करायचा हे शिकलात तर तुमची चांगली कमाई होवू शकते.
स्ट्राईपने अशा पद्धतीचा चॅटजीपीटी आधारीत चॅटबॉट बनवला आहे. हा चॅटबॉट टेक्निकल डॉक्यूमेंटस समजून घेवून त्यानुसार डेव्हलपर्स ची मदत करतो.
आता आपल्याला वाटेल की असे चॅटबॉट तयार करण्यासाठी आपल्याला बरेच प्रोग्राम लिहावे लागतील. पण थांबा यासाठी तुम्ही प्रोग्रामर असण्याची मुळीच गरज नाही. याबाबतीत ही तुम्हाला चॅटजीपीटी ची मदत घेता येईल. पायथॅान च्या मदतीने AI चॅटबॉट कसा तयार करायचा हे चॅटजीपीटी ला विचारा लगेच तुम्हाला त्यासाठीचे मार्गदर्शन मिळायला सुरुवात होईल.
यासाठी OpenAI API च्या मदतीने तुम्हाला तुमच्या माहितीनुसार JSON फाईलमध्ये माहिती मिळेल. टाईपस्क्रिप्ट वापरुन तुम्ही तुमच्या चॅटबॉटसाठी फ्रन्ट एन्ड तयार करु शकता. चॅटजीपीटी या सर्व गोष्टीत तुम्हाला मदत करु शकते. असे ग्राहकाच्या मागणीनुसार तयार केलेले चॅटबॉट तुम्ही कंपन्यांचे कस्टमर सपोर्ट, तांत्रिक साह्य देणारे पोर्टल अशांना विकू शकता.


४. इ मेल ॲफिलेट मार्केटींग

४. इ मेल ॲफिलेट मार्केटींग


ऑनलाईन पैसा कमावण्यासाठी इ मेल ॲफिलेट मार्केटींग हा सोपा मार्ग आहे. यासाठीचे मेल तुम्ही चॅटजीपीटी कडून लिहून घेवू शकता. चॅटजीपीटी अतिशय प्रभावी पद्धतीने असे मेल तुमच्यासाठी लिहू शकते. मेलची भाषा प्रभावी असेल तर ती ग्राहकाला सदरील लिंक क्लिक करण्यासाठी अपील करते.
ॲफिलेट मार्केटींग सुरु करण्यासाठी तुम्हाला ॲमेझॉन, शापीफाय कन्व्हर्टकिट यांपैकी एक जॉईन करावे लागेल.
यानंतरचा टप्पा असेल तो म्हणजे म मेल लिस्ट तयार करणे. आपले ग्राहक कोण असतील हे ठरवून त्या प्रमाणे ही चादी तुम्हाला तयार करावी लागेल. यादी तयार झाल्यानंतर चॅटजीपीटी ला इमेल कँपेन तयार करण्यासाठी सांगा. त्यानंतर हे मेल पाठविल्यानंतर क्लिक थ्रु रेट आणि कन्वर्जन रेट तपासा. तुमची इ मेल कॅम्पेन किती यशस्वी ठरत आहे हे तुम्हाला या डेटावरुन कळेल.


५. प्रॉम्ट एक्सपर्ट बना

५. प्रॉम्ट एक्सपर्ट बना


चॅटजीपीटी असो किंवा त्यासारखे आर्टीफिशियल इंटेलिजन्स वर आधारीत प्रणाली असो हे सर्व आपल्याला हवे ते करुन देवू शकतात. पण यात एक अडचण आहे. आपल्याला काय हवे ते आपल्याला जर या प्रणालीला सांगता आले नाही तर हवी ती माहिती आपल्याला मिळू शकणार नाही. या प्रणाली कितीही इंटेलिजंट असल्या तरी मानवी भाषेची तुलना करता काही मर्यादा पडतात. त्यामुळे हवे ते पाहिजे असल्यास एका ठराविक साचामध्ये या प्रणालीमध्ये आपल्याला सांगावो लागते. तुम्ही जर AI प्रणालीव्दारे चित्रे तयार करुन घेतली असतील तर तुमहाला या प्रॉम्ट्स चे महत्व कळेल. सुरुवातीला जरी वाटले नव्हे की असे प्रॉम्ट तयार करणे का एक उद्योग होईल तरी आज आपण पाहते की बरेच जण असे आढळतात जे असे प्रॉम्ट्स तयार करतात आणि ते विकतात. लवकरच AI Prompts Engineering वर कोर्स बाजारात आले तर आश्चर्य वाटायला नको. जर तुम्ही या AI Prompts मध्ये प्राविण्य मिळवले तर असे Prompts तयार करुन तुम्ही विकू शकता. अर्थात हे करण्यासाठी तुम्हाला ChatGPT चे ज्ञान असणे आवश्यक आहे.


६. चॅटजीपीटी चा साह्याने व्हिडीओ बनवा.

व्हिडीओ


इंटरनेटवर असे बरेच विषय आहेत ज्यावर अजून पुरेशी माहिती उपलब्ध नाही. अशा विषयांवर आधारित व्हिडीओ आयडिया तुम्ही चॅटजीपीटी ला विचारु शकता. यानंतर या आयडियावर व्हिडीओसाठी स्क्रिप्ट लिहू शकता. किंवा चॅटजीपीटी ला स्क्रिप्ट लिहायला सांगू शतात. एकदा का तुमची स्क्रिप्ट तयार झाली की Pictory.ai किंवा invideo.io यांसारख्या साईटवर जावून आपल्या स्क्रिप्टनुसार व्हिडीओ तयार करु शकता. तयार झालेला व्हिडीओ Youtube वर अपलोड करुन पैसे कमावू शकता.
याचबरोबर युट्यूबवर टॉपिक व्हिडीओ जसे जो विषय ट्रेंडींगमध्ये असेल त्यानुसार शॉर्टस तयार करुन त्यातूनही पैसे कमावता येतात.


७. इ बुक तयार करुन प्रकाशित करा.

इ बुक


Reuters च्या रिपोटनुसार चॅटजीपीटी आल्यानंतर विविध प्रकारच्या इ बुक्समध्ये ॲमेझॉन वर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कारण चॅटजीपीटी ने आपल्या कल्पनांना मूर्त रुप देण्याचे काम सुलभ केले आहे. बरेच जण वेगवेगळया विषयावर चॅटजीपीटी च्या साह्याने इ बुक्स लिहून ॲमेझॉन वर ते विक्रीला ठेवत आहेत. मुलांसाठीची पुस्तके असोत किंवा मोटीवेशनल लेक्चर्स , विज्ञानकथा असोत किंवा कादंबरी चॅटजीपीटी ची मदत घेवून अशी पुस्तके लिहीने व ती ऑनलाईन विक्रीला ठेवणे सोपे झाले आहे. अर्थात चॅटजीपीटी संपूर्ण पुस्तक तुम्हाला लिहून देवू शकत नाही पण ढोबळ आऊटलाईन ने सुरुवात करणे व त्यानंतर एकेक परिच्छेद तयार करून पुस्तक पूर्ण करणे हे इथे करता येते.
Book Bolt या संकेतस्थळाला जर तुम्ही भेट दिली तर आपल्या लक्षात येईल की, इथे पुस्तक लिहीने , प्रकाशित करणे किती सोपे झाले आहे.येथे हे पुस्तक विक्रीला सुद्धा आपल्याला ठेवता येईल. या पुस्तकामधून पैसे कमावणे हा एक मार्ग चॅटजीपीटीने उपलब्ध करुन दिला आहे.


८. फ्रिलांन्स रायटींग व कन्टेंट रायटींग

फ्रिलांन्स रायटींग


आज आपण पाहतो अनेक प्रकारच्या वेबसाईटसवर प्रचंड प्रमाणात लेख प्रत्येक क्षणाला प्रकाशित होत असतात. आता असे लेख लिहीण्यासाठी तेवढ्या प्रमाणात लोकही लागत असणार. चॅटजीपीटी च्या साह्याने आपण आपल्या विषयातील विविध लेख लिहून ते अशा वेबसाईट्स ला विकू शकतो. चॅटजीपीटीची मदत घेतल्याने असे लेख अभ्यासपूर्ण व प्रोफेशनल असतात. अर्थात फ्रिलासिंग म्हणजे फक्त ब्लॉग साठी पोस्ट लिहिणे एवढेच नाही तर चॅटजीपीटीचा वापर करून तुम्ही भाषांतर, डीजीटल मार्केटींग, प्रुफ रिडींग, प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन असे अनेक प्रकार तुम्ही चॅटजीपीटी वापरुन करु शकता.
Fiverr या साईटवर AI सर्विस साठी वेगळी कॅटेगरी तयार केलेली आहे. येथे आपण वेगवेगळया प्रकारचे जॉब्स जसे AI Fact Checking, कन्टेंट संपादन, टेक्नीकल रायटींग शोधू शकतो.
जर तुम्हाला चॅटजीपीटी चांगल्या प्रकारे कळले असेत तर आपल्या आवडीचा विषय निवडा आणि लिहायला सुरुवात करा.
जर तुम्ही यापैकी चॅटजीपीटी वापरुन करत असाल तर कमेंट मध्ये आमच्या वाचकांना नक्की सांगा.

तुम्हाला हे ही आवडेल : मंगळ

Leave a Comment